Monday, January 30, 2023

मातीतल्या कुस्तीची ऑलीम्पिककडे वाटचाल..  युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मातीच्या कुस्तीला मान्यता.. 


मातीतल्या कुस्तीची ऑलीम्पिककडे वाटचाल.. 
युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मातीच्या कुस्तीला मान्यता.. 

भारतातील प्राचीन इतिहास आणि त्या अगोदरपासून हजारो वर्षांपासून कुस्ती हा खेळ भारतात खेळला जातो. इथे पूर्वीपासून मातीतील कुस्तीला राजमान्यता आणि लोकाश्रय आहे. मातीतील खूप जुनी संघटना भारतीय कुस्ती महासंघ (भारतीय शैली) यांनी जवळपास ६०-६५ वर्षे हि संघटना आणि लाल मातीतील कुस्ती टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी खूप कष्ट घेतले. आतापर्यन्त जेवढे हिंदकेसरी, भारत केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत भीम असे अनेक मानाचे किताब या संघटनेने दिले. मातीतील हीच संघटना अधिकृत आहे हे दिल्ली हायकोर्टने सिद्ध केले. बऱ्याच कुस्तीतील काही प्रवृत्तीनी सत्ता, पैसे याच्या जोरावर भारतीय शैली कुस्ती महासंघ याना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण गौरव सचदेवा, रामाश्रय यादव, नफेसिह राठी यांच्या टीमने कोर्टाच्या माध्यमातून अशा खेळात घुसलेल्या वाईट प्रवृत्तीना जशास तसे उत्तर दिले. 
मातीतील कुस्ती आता जगभरात खेळली जाणार आहे आणि तीसुद्धा युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेच्या मान्यतेने. हैद्राबाद येथे झालेल्या ५१ व्या हिंदकेसरी स्पर्धेवेळी UWW असोसिएटेड स्टाइल्सच्या अध्यक्षा आणि ब्यूरो सदस्य रॉडिका यॅक्सी यांनी यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून भारतीय शैली कुस्तीला युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेने मान्यता दिली असून हा मातीतील खेळाचा जगभरात प्रसार होणार आहे. भारतासाठी खरेच हि अभिमानाची बाब आणि एक मोठी संधी आहे. आपली खरी ओळख हि मातीतील कुस्ती आहे आणि मातीतल्या स्पर्धा आता जागतिक पातळीवर होतील आणि त्याचा फायदा इथल्या खेळाडूंना होईल. तसेच भारतातील प्रशिक्षक याना जगभरातील वेगवेगळ्या देशात तिथल्या खेळाडूंना शिकविण्यासाठी संधी निर्माण होतील. याचा जास्त फायदा हा भारतातील पैलवान आणि इथल्या प्रशिक्षक लोकांना होणार आहे.  

महाराष्ट्राने या संधीचे सोने करावे 
युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्रात एक चांगली संघटना तयार होणे गरजेचे आहे. दोन गटात सुरु असलेले राजकारण यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीत नेहमी वाद सुरु आहेत. या दोन गटापासून अलिप्त अशी एक मातीतील संघटना इथे होणे गरजेचे आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात आपली पाळेमुळे रोवली पाहिजे. रामाश्रय यादव, गौरव सचदेवा यांच्या टीमने या २ राज्याकडे खूप लक्ष दिले पाहिजे. कारण या दोन्ही राज्यात मातीच्या कुस्तीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आणि इथे सर्वात जास्त पैसा हा कुस्ती खेळावर खर्च केला जातो. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र या संघटनेची त्यांनी बांधणी केली पाहिजे. मोहन खोपडे यांच्यासारखा एक धडपड्या सतत कुस्तीसाठी झटणारा सचिव चांगले काम करत आहे. अधिकृत संघटना घोषणा करून UWW  च्या आणि भारतीय शैली महासंघाच्या मान्यतेने मोठ्या स्पर्धा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यात झाल्या पाहिजेत. 

द्रोणाचार्य अवार्ड स्व. रोशनलालजी सचदेवा सर यांचे स्वप्न पूर्ण 
गेली ६-७ दशके स्व. रोशनलालजी आणि त्यांच्या टीमने हि कुस्ती टिकविण्यासाठी तसेच मातीतील स्पर्धा हिंदकेसरी, भारत केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत भीम अशा अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी घेण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांच्या जोडीला रामाश्रय यादव, गौरव सचदेवा व भारतीय शैली कुस्ती महासंघ यांच्या टीमने बरीच वर्षे  केला. युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मान्यता मातीतल्या कुस्तीला मिळवून भारतीय शैली कुस्ती महासंघाने  रोशनलालजी यांना खरी श्रध्दांजली वाहिली आहे.

दुसऱ्या संघटनेची दादागिरी इथून पुढे बंद होईल 
मातीतल्या कुस्तीला खूप मोठा अडसर दुसऱ्या कुस्तीतील  संघटनेचा होता. बऱ्याच लोकांनी भारतीय शैली कुस्ती प्रकाराला मान्यता मिळू नये तसेच त्यांच्या संघटनेला मान्यता मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले. पण UWW ने सर्व अभ्यास करून भारतीय कुस्ती शैली महासंघाशी करार केला. ज्यावेळी बजरंग पुनिया आणि इतर खेळाडूंनी ब्रजभूषण आणि त्यांच्या संघटनेवर आरोप केले तेव्हा जगभरातील वृत्तपत्रांनी या बातमीची दखल घेतली. यामुळे या खेळाची बदनामी झाली. कुस्तीच्या जीवावर एका सचिवाने करोडो रुपयाची माया जमविली हे खेळाडूंनी टीव्हीवर सांगितले. या आरोपांची निपक्ष चौकशी होऊन नवीन चांगले खेळाडू टीम या संघटनेवर पाहिजे. एका राज्याचे जास्त लोक असले कि ते फक्त आपल्या खेळाडूंना न्याय देतात त्यामुळे प्रत्येक राज्यातील लोकांना संधी दिली पाहिजे. 
- दत्तात्रय जाधव - सोंडोलीकर 
कुस्ती संघटक- अभ्यासक 


 

ओलंपिक की ओर मिट्टी की कुश्ती का कदम.. यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ऑर्गनाइजेशन मिट्टी की कुश्ती को मान्यता

 


ओलंपिक की ओर मिट्टी की कुश्ती का कदम.. 
यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ऑर्गनाइजेशन मिट्टी की कुश्ती को मान्यता

कुश्ती भारत में अपने प्राचीन इतिहास से और उससे हजारों साल पहले से खेली जा रही है। मिट्टी की कुश्ती को प्राचीन काल से ही यहां राजसी मान्यता और जन समर्थन प्राप्त है। मिट्टी की कुश्ती की एक बहुत पुरानी संस्था इंडियन रेसलिंग फेडरेशन (इंडियन स्टाइल) ने लगभग 60-65 वर्षों तक इस संगठन और लाल मिट्टी पर कुश्ती को बनाए रखने और विकसित करने के लिए कड़ी मेहनत की। अब तक इस संस्था ने हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तम ए हिंद, भारत भीम जैसी कई प्रतिष्ठित उपाधियां दी हैं। दिल्ली हाईकोर्ट ने साबित कर दिया कि मिट्टी में एक ही संगठन अधिकृत है।कुश्ती में कई प्रवृत्तियों ने भारतीय शैली कुश्ती महासंघ को सत्ता और धन से परेशान करने की कोशिश की लेकिन गौरव सचदेवा, रामाश्रय यादव, नफेसिह राठी की टीम ने अदालत के माध्यम से इस तरह के खेल में प्रवेश करने वाली बुरी प्रवृत्तियों का जवाब दिया।

मिट्टी की कुश्ती अब दुनिया भर में खेली जा रही है और वह भी संयुक्त विश्व कुश्ती संगठन की मंजूरी से। हैदराबाद में आयोजित 51वें हिंदकेसरी टूर्नामेंट में यूडब्ल्यूडब्ल्यू एसोसिएटेड स्टाइल्स की अध्यक्ष और ब्यूरो सदस्य रोडिका याक्सी ने इस अवसर पर एक समझौता पर हस्ताक्षर किए, जिसमें यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ऑर्गनाइजेशन द्वारा भारतीय शैली की कुश्ती को मान्यता दी गई और यह मिट्टी का खेल दुनिया भर में फैलने जा रहा है। यह वास्तव में भारत के लिए गर्व की बात है और एक महान अवसर है। हमारी असली पहचान मिट्टी की कुश्ती है और मिट्टी की प्रतियोगिताएं अब वैश्विक स्तर पर होंगी और यहां के एथलीटों को इसका फायदा मिलेगा। साथ ही, भारत के कोचों को दुनिया भर के विभिन्न देशों में खिलाड़ियों को पढ़ाने के अवसर भी मिलेंगे। इससे भारत के पहलवानों और कोचों को काफी फायदा होगा।


महाराष्ट्र को इस मौके का फायदा उठाना चाहिए
संयुक्त विश्व कुश्ती संघ की मान्यता मिलने के बाद महाराष्ट्र में एक अच्छा संगठन बनाना जरूरी है। दोनों गुटों के बीच चल रही राजनीति के चलते महाराष्ट्र की कुश्ती में हमेशा विवाद होते रहते हैं। मिट्टी की कुश्ती का एक बढ़ा संगठन होना आवश्यक है जो इन दो समूहों से अलग हो। इंडियन स्टाइल रेसलिंग फेडरेशन को महाराष्ट्र और कर्नाटक में अपनी जड़ें जमानी चाहिए। रामाश्रय यादव, गौरव सचदेवा की टीम को इन दोनों राज्यों पर विशेष ध्यान देना चाहिए। क्‍योंकि इन दोनों राज्‍यों में मिट्टी की कुश्ती का बहुत बड़ा फैन बेस है। और यहां सबसे ज्यादा पैसा कुश्ती पर खर्च किया जाता है। इसलिए उन्हें कर्नाटक, महाराष्ट्र का संगठन बनाना चाहिए। मोहन खोपड़े जैसा संघर्षशील सचिव अच्छा काम कर रहा है। आधिकारिक संगठन की घोषणा करके UWW और इंडियन स्टाइल फेडरेशन की मंजूरी के साथ महाराष्ट्र, कर्नाटक और अन्य राज्यों में प्रमुख प्रतियोगिताएं आयोजित की जानी चाहिए।

द्रोणाचार्य पुरस्कार रोशनलालजी सचदेवा सर का 6-7 दशकों का सपना पूरा हुआ है।
 रोशन लालजी और उनकी टीम ने इस कुश्ती को कायम रखने के लिए बहुत मेहनत की और मिट्टी पर हिंदकेसरी, भारत केसरी, रुस्तम ए हिंद, भारत भीम जैसे कई बड़े टूर्नामेंट आयोजित किए। रामाश्रय यादव, गौरव सचदेवा और इंडियन स्टाइल रेसलिंग फेडरेशन की टीम की मेहनत से  मिट्टी की कुश्ती को संयुक्त विश्व कुश्ती संगठन से मान्यता दिलाकर रोशन लालजी को सच्ची श्रद्धांजलि दी है।

यहां से दूसरे संगठनों की दादागीरी बंद होगी
मिट्टी की कुश्ती में एक और बड़ी बाधा अन्य कुश्ती संघठन का था। बहुत से लोगों ने  भारतीय शैली और संगठन को मान्यता नहीं दिलाने के लिए बहुत कोशिश की। लेकिन UWW ने पूरी रिसर्च की और इंडियन रेसलिंग स्टाइल फेडरेशन के साथ डील साइन की। जब बजरंग पुनिया और अन्य खिलाड़ियों ने ब्रजभूषण और उनके संगठन के खिलाफ आरोप लगाए, तो दुनिया भर के अखबारों ने इस खबर को उठाया। इससे खेल की बदनामी हुई। खिलाड़ियों ने टीवी पर कहा कि एक सेक्रेटरी ने कुश्ती की जान पर करोड़ों रुपए वसूले थे। इन आरोपों की निष्पक्ष जांच के बाद संगठन को एक नई अच्छी खिलाड़ी टीम की जरूरत है। अगर किसी एक राज्य में ज्यादा लोग हैं तो वो सिर्फ अपने खिलाड़ियों को ध्यान देते है।  इसलिए हर राज्य के पदाधिकारी  लोगों को मौका दिया जाना चाहिए.

- दत्तात्रय जाधव - सोंडोलीकर कुस्ती संघटक- अभ्यासक 


Wednesday, April 13, 2022

कुस्तीगीर 'संघटना' कुस्तीच्या 'मुळावर'

 कुस्तीगीर 'संघटना' कुस्तीच्या 'मुळावर' 

या वर्षी सातारा येथे महाराष्ट— केसरी स्पर्धा पार पडली. संयाेजन-नियाेजन साेहळ्यात खूप भव्यदिव्यता हाेती. नेहमीप्रमाणेच महाराष्ट— केसरी हाेणाऱ्या खेळाडूला  ’मान’ मिळाला पण ’धन’ मिळाले नाही. पृथ्वीराज पाटील याचे काैतुक करायला हवे कि त्याने हि गाेष्ट चॅनेल आणि साेशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे मांडली. आणि 2 दिवस सर्व मीडिया आणि लाेकांमधून कुस्तीगीर परिषदेच्या कारभारावर टीका हाेऊ लागली. पण काैतुक करण्यासाठी एक गाेष्ट अगाेदरच झाली हाेती ती म्हणजे कै. संजय पाटील (दादा) महाराष्ट— केसरी यांच्या स्मरणार्थ पै. धनाजी काका पाटील आणि पै. संताेष वेताळ यांनी 1 लाख जाहीर केले हाेते. पैलवान पृथ्वीराजला बक्षीस न मिळाल्याची चर्चा सुरु झाल्यानांतगर लगेच सातारचे आमदार मा. शिवेंद्रराजे भाेसले  यांनी 5 लाख, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि 2 लाख, विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या वतीने 5 लाख जाहीर केले. काेल्हापूर महाविककास आघाडी यांनी प्रत्येकी 5 लाख जाहीर केले. खासदार उदयनराजे भाेसले यांनी बुलेट गाडी देण्याची घाेषणा केली. या गाेष्टी का घडल्या तर पृथ्वीराज ने त्याची खंत बाेलून दाखवली. आतापर्यंत जे महाराष्ट केसरी झालेत त्यावेळी काही आयाेजकांनी चांगली बक्षिसे दिली हाेती, प्रामुख्याने उल्लेख आमदार महेश लांडगे यांचा करता येईल. आयाेजक बक्षीस द्यायला तयार असतात फक्त कुस्तीगीर परिषदेने आयाेजकांना  ती बक्षीस रक्कम यादी दिली पाहिजे. आयाेजकांना एक यादी न चुकता मिळते ती म्हणजे पदाधिकारी लाेकांना प्रवास भत्ता. बक्षीस न दिलेली चर्चा सुरु झाल्यानंतर कुस्तीगीर परिषद आणि सातारा जिल्हा तालीम संघ यांच्याकडे मीडिया तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी जाब विचारला तेव्हा कुस्तीगीर परिषदेने सांगितले कि सातारा तालीम संघ हे आयाेजक-संयाेजक हाेते त्यांची ती जबाबदारी आहे. abp माझाच्या मुलाखतीमध्ये सातारा तालीम संघाचे संयाेजक दीपक पवार हे सांगत आहेत कि आम्ही अडीच ते तीन काेटी रुपये या महाराष्ट केसरी स्पर्धेसाठी खर्च केला आहे. अडीच ते तीन काेटी नक्की कशावर खर्च केला त्याच्या हिशाेब महाराष्ट्राच्या जनतेसमाेर सातारा तालीम संघ आणि महाराष्ट राज्य कुस्तीगीर परिषद यांनी द्यावा.  दीपक पवारसाहेब खर्च तुम्ही खूपच केला, पण खेळाडूसाठी 50 लाख जरी बाजूला ठेवले असते तर एवढा घाेळ झालाच नसता? आणि एकमेकांवर आराेप करायची वेळ आलीच नसती. 


इथे क्लिक करा ABP  माझा ची बातमी लिंक ओपन हाेईल. यामध्ये दीपक पवार स्वतः सांगत आहेत कि अडीच ते तीन काेटी रुपये खर्च केले. https://www.youtube.com/watch?v=jziMDG11_to

 

बाेलण्यात पदाधिकारी कुठेही कमी पडत नाहीत, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अडीच ते तीन काेटींमध्ये काय काय हाेऊ शकते याचा अंदाज आपण लावू शकताे. महाराष्ट— कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब आहेत. त्यांचे सर्व गाेष्टीवर बारीक लक्ष आहे काय? पदाधिकारी आता काही झाले तर ललित लांडगे टीमकडेच बाेट दाखवीतात. बाळासाहेब लांडगे यांनी आपलाच मुलगा ललित लांडगे यांच्याकडे सूत्रे दिली आहेत. पण ललित लांडगे याना सर्वांचाच विराेध आहे असे एकंदरीत पदाधिकारी बाेलण्यातून जाणवत आहे. संदीप भाेंडवे यांचे उपाेषण बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या टीमला हाताळता आले नाही. एक करारपत्र त्यांना दिले असते तर सर्व विषय मिटला असता. पण बाळासाहेब लांडगे यांची वेळ मारून न्यायची सवय त्यांना नडली.  

राेहा-रायगड येथे महाराष्ट— केसरी स्पर्धेवेळी असेच महाराष्ट— केसरी पैलवान समाधान घाेडके यास एक रुपयासुद्धा बक्षीस दिले नव्हते. 


२०११ साली महाराष्ट्र टाइम्स मध्ये आले बातमी इथे क्लिक करा आणि नक्की वाचा. 

http://dattajadhavkusti.blogspot.com/2022/04/blog-post_95.html


त्यावेळी समाधान घाेडके याने माझ्याकडे हि खंत बाेलून दाखवली मी मुंबईतील पत्रकार आणि सर्व मीडिया यांच्याकडे दाद मागितली. 2011 साली महाराष्ट टाइम्स मध्ये 5-6 दिवस यावर पत्रकार महेश विचारे यांनी जाेरदार लिखाण केले. ज्या ज्या पदाधिकारी लाेकांनी मानधन घेतले त्यांचे पुराव्यासहीत आणि त्यांच्या नावासहित दैनिक लाेकमत तसेच महाराष्ट  टाइम्स मध्ये बातम्या छापून आल्या. 


२०११ साली पदाधिकारी लोकांना मानधन वाटले पण  महाराष्ट्र केसरी विजेत्याला बक्षीस दिले नाही. इथे क्लिक करा. 

http://dattajadhavkusti.blogspot.com/2022/04/blog-post_13.html


इथे क्लिक करा आणि 2011 राेजी झालेल्या पदाधिकारी मानधन वाटप IBN  लाेकमत वरची मुलाखत नक्की बघा.

https://www.youtube.com/watch?v=KlsK60M6gV4&t=755s


त्यावेळी सुद्धा उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारसाहेब यांनी घाेषणा केली हाेती. महाराष्ट केसरी हाेणाऱ्या पैलवानास 3 लाख, उप महाराष्ट केसरी 2 लाख तसेच इतर वजनी गटातील पैलवान याना चांगले बक्षीस तसेच माजी कुस्तीगिरांना याना 10 हजारांचे पेन्शन असे जाहिर केले हाेते. 


अजित पवार यांनी केलेल्या घोषणेची महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी इथे क्लिक करून बघा. 


http://dattajadhavkusti.blogspot.com/2022/04/blog-post_55.html


 यावेळी आदरणीय गणपतराव आंदळकर, याेगेश दाेडके, बाळासाहेब लांडगे आणि कुस्तीतील बरेच पदाधिकारी उपस्थित हाेते. मग या घाेषणेचे पुढे काय झाले? कुस्तीगीर परिषदेने त्याचा किती पाठपुरावा केला हा संशाेधनाचा विषय ठरेल? महाराष्ट्रात एवढ्या माेठ्या संस्थेला काहीच करणे अशक्य नाही. इथे दिलदार लाेकांची पण काही कमी नाही. फक्त 2 गट करून हा माझा ताे त्याचा करून आपली खुर्ची सांभाळायची हे सर्व बंद झाले पाहिजे. पृथ्वीराज पाटील याचा  व्हिडिओ आणि बातमी पाहून 2 दिवसात जवळपास 20-25 लाखाची मदत गाेळा झाली. 

महाराष्ट्रातील कुस्तीवर इथल्या जनतेचे किती प्रेम आहे ते दिसत आहे. पैलवान चांगले आहेत, मदत करणारे खूप आहेत, तळमळीने काम करणारे खूप आहेत. फक्त संघटना कमी पडत आहे. उप महाराष्ट केसरी विशाल बनकर याला सुद्धा शासन आणि दानशूर जनतेने मदत केली पाहिजे. फक्त कुस्तीगीर परिषदेमधील जी काही मनमानी चालली आहे ती आता थांबली पाहिजे. झी कुस्ती दंगलवेळी खुर्चीवर बसण्यावरून भांडण करणारे काही ’नाम’ धरी पदाधिकारी इथे आहेत. माझा सत्कार राहिला असे सांगणारे पदाधिकारी आहेत. महाराष्ट केसरी म्हणजे पर्यटन आहे काय? पदाधिकारी येणार हाॅटेलमध्ये राहणार 4 दिवस मिरविणार. वाटखर्चीच्या नावाखाली पैशाचे पाकीट घेणार आणि परत पुढच्या वर्षी दिसणार. मग कुस्तीचा विकास कसा हाेणार?  परिषदेने पैलवान आणि त्यांच्या विकासासाठी भरीव असे काहीच केले नाही. डाेपिंगची टीमसाठी एवढा पाठपुरावा करून सुद्धा यावर्षी त्यावर परिषदेने काहीच केले नाही. फक्त महाराष्ट केसरी स्पर्धा एवढेच काम परिषदेकडे आहे. स्पर्धा झाली कि 8 दिवस कुस्तीची प्रसिद्धी हाेते, त्यानंतर कुस्ती आणि पैलवान हा विषय मग तालमीपुरता मर्यादित राहताे. भाषण करताना आमचे लक्ष्य फक्त ऑलीम्पिक आहे आणि ऑलीम्पिक मेडल आल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही अशी प्रसिद्धीसाठी एखादी घाेषणा करून काही हाेणार नाही. आता गरज आहे ती पुढच्या वर्षी पासून महाराष्ट  केसरीला किती बक्षिसे देणार, उपमहाराष्ट केसरीला किती बक्षीसे देणार आणि इतर गटात काय बक्षिसे असणार ते आताच जाहिर करा. उप महाराष्ट केसरीला सुद्धा चांगले बक्षीस दिले पाहिजे. इथून पुढे अगाेदरच बक्षिसे जाहीर झालीच पाहिजेत. इतर गाेष्टीचा खर्च कमी करावाच लागेल. हि स्पर्धा खेळाडूसाठी आहे, त्यांनाच जर बक्षीस मिळणार नसेल तर मग स्पर्धा नक्की कशासाठी?


खाशाबा जाधव यांच्या नावाने हाेणार शासनाची स्पर्धा का हाेत नाही? 

2011 साली मुंबई येथे महाराष्ट— शासनाच्या वतीने खाशाबा जाधव स्पर्धा झाली हाेती. हि स्पर्धा महाराष्ट राज्य कुस्तिगीर परिषद यांच्या मार्गदार्नखाली हाेते. त्यावर्षी मी या स्पर्धेचा सर्व तपशील माहिती अधिकारातून मागविला आणि धक्कादायक माहिती समाेर आली. (साेबत त्याची लाेकमत मधील बातमी जाेडत आहे. यासाठी या लिंक वर क्लिक करा) या स्पर्धेमध्ये 50 लाख निधी असताना कुस्तीगीर परिषदेने बक्षिसे 9 लाख 60 रुपयेही दिली. इतर खर्च 30 लाख 74 हजार 203 रुपयांचा केला. आणि 9 लाख 65 हजार 797 रुपयाचा निधी शासनाला परत केला. जे ह्या 9 लाख 65 हजारांची बक्षीसे दिली असती तर कुस्तीगिरांना डबल बक्षिसे मिळाली असती. पण कुस्तीगीर परिषद हि खेळाडूसाठी नाहीच असे या उदाहरणावरून म्हणावे लागेल. 

खाशाबा जाधव स्पर्धेत नक्की काय झाले होते त्याची लोकमत मधील बातमीसाठी इथे क्लिक करा.


http://dattajadhavkusti.blogspot.com/2022/04/blog-post.html


एखादी संस्था, संघटना किव्हा लाेकप्रतिनिधी जर मनमानी चालणार असेल असेल तर आपले सर्वांचे कर्त्यव्य आहे कि त्या व्यक्तीला जाब विचारला पाहिजे. संघटनेत चांगले पैलवान पाहिजेत. आता पण संघटनेत खूप चांगले काम करणारे लाेक आहेत, पण संघटनेच्या बाहेर सुद्धा खूप चांगले पैलवान आहेत त्याना संधी दिली तर ते संधीचे साेने करतील. कुस्तीतील प्रत्येकाने एवढे जाणले पाहिजे कि, कुस्तीमुळे तुम्ही आहात, 

तुमच्यामुळे कुस्ती नाही. 

- दत्तात्रय राजाराम जाधव 

साेंडाेली, तालुका : शाहूवाडी. जिल्हा: काेल्हापूर

८४२५८४९२४६ 



-: काही महत्वाचे मुद्दे :-

1) कुस्ती संघटनेत आता खèया पैलवानाला स्थान नाही. त्यामुळे पैलवान हिताचे निर्णय हाेत नाहीत. 

2) कुस्तीगीर परिषदेमध्ये तेच तेच पदाधिकारी जागा अडवून बसले आहे. बाळासाहेब लांडगे हे गेली 40-45 वर्षे संघटनेवर आहेत. तेच तेच पदाधिकारी असल्यामुळे प्रत्येक जिल्हा तालीम संघामध्ये  नाराजी. नवीन लाेकांना संधी मिळत नाही. 

3) कुठलीही स्पर्धा हाेणार असेल तर त्याठिकाणी खेळाडूसाठी अगाेदर विचार झाला पाहिजे. 

4) कुठलीही स्पर्धा हाेऊ दे त्याचा 1-1 रुपयाचा हिशाेब कुस्तीगीर परिषदेने आपल्या वेबसाईट आणि फेसबुक, व्हाटसपच्या माध्यमातून  जनतेसमाेर ठेवावा. यावर्षीचा महाराष्ट  केसरी खर्च लवकरात लवकर उपल्बध करून द्यावा. 

5) पदाधिकारी मानधन बंद झालेच पाहिजे. ताे खर्च बक्षिसामध्ये  देण्यात यावा. 

6) नवीन स्पर्धा सुरु करण्यासाठी प्रत्येक तालीम संघाला मान्यता द्यावी. प्रत्येक वेळी स्पर्धा घ्यायची असेल तर कुस्तीगीर परिषद परवानगीची गरज नसावी. भारतीय कुस्ती महासंघाने यामध्ये महत्वाची  भूमिका घ्यावी. 

7) नवी मुंबई येथील तालीम संघ यांच्याकडे आज 2 तालमी आहेत. भरपूर पैलवान आहेत, त्यांना  का  परवानगी देत नाही? हे वरिष्ठांनी तपासून पाहावे. 

8) यावर्षी प्रत्येक वजनी गटात नंबर आलेल्या 3 पैलवानसाठी काही विशेष मानधन याेजना तसेच 

त्यांचे कॅम्प लावण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत. 


- दत्तात्रय राजाराम जाधव 

साेंडाेली, तालुका : शाहूवाडी. जिल्हा: काेल्हापूर

८४२५८४९२४६

अजित पवारसाहेब यांनी केलेल्या घोषणेचे नक्की पुढे काय झाले?

त्यावेळी सुद्धा उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारसाहेब यांनी घाेषणा केली हाेती. महाराष्ट केसरी हाेणाऱ्या पैलवानास 3 लाख, उप महाराष्ट केसरी 2 लाख तसेच इतर वजनी गटातील पैलवान याना चांगले बक्षीस तसेच माजी कुस्तीगिरांना याना 10 हजारांचे पेन्शन असे जाहिर केले हाेते. 



 

राेहा-रायगड येथे महाराष्ट— केसरी स्पर्धेवेळी असेच महाराष्ट— केसरी पैलवान समाधान घाेडके यास एक रुपयासुद्धा बक्षीस दिले नव्हते.

त्यावेळी समाधान घाेडके याने माझ्याकडे हि खंत बाेलून दाखवली मी मुंबईतील पत्रकार आणि सर्व मीडिया यांच्याकडे दाद मागितली. 2011 साली महाराष्ट टाइम्स मध्ये 5-6 दिवस यावर पत्रकार महेश विचारे यांनी जाेरदार लिखाण केले. ज्या ज्या पदाधिकारी लाेकांनी मानधन घेतले त्यांचे पुराव्यासहीत आणि त्यांच्या नावासहित दैनिक लाेकमत तसेच महाराष्ट  टाइम्स मध्ये बातम्या छापून आल्या. 


 

२०११ साली पदाधिकारी लोकांना मानधन वाटले पण महाराष्ट्र केसरी विजेत्याला बक्षीस दिले नाही.