Tuesday, November 24, 2015

सोंडोलीत नाईकबा यात्रेनिमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मल्लयुद्ध

सोंडोलीत नाईकबा यात्रेनिमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मल्लयुद्ध
दोन महाराष्ट्र केसरी आमने सामने - विजय चौधरी विरुद्ध समाधान घोडके लढत
सोंडोली, दि. - कोल्हापूर जिल्हातील सोंडोली येथील नाईकबा यात्रेनिमित्त तुफानी कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्धाचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता केले आहे. १ नंबरची 2 लाख बक्षीस असलेली कुस्ती शिवबा प्रतिष्ठान, सोंडोली, हेमंत पाटील (फ्लेक्स जिम, मुंबई) यांच्यातर्फे विजय चौधरी (महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी रोहित पटेल याचा पट्टा ) वि. समाधान घोडके (महाराष्ट्र केसरी, जालिंदर मुंडे यांचा पट्टा) यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. २ नंबर ५१ हजार बक्षीस असलेली कुस्ती सर्जेराव माईगडे, विघ्नहर्ता रोडलाइन्स, नवी मुंबई यांच्यातर्फे देवा घोडके (कोल्हापूर) वि. समीर देसाई (पुणे), ३ नंबर ३१ हजार इनाम असलेली कुस्ती बाळू बा. चोपडे, सिद्धिविनायक रोडलाइन्स, मुंबई यांच्यातर्फे संजय जाधव (भगवान सावंत यांचा पट्टा, सोंडोली) वि. निलेश रायकर (पुणे) या ३ प्रमुख लढती होणार असून ५० च्या वर तुफानी कुस्त्या पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कुस्ती निवेदक म्हणून सुरेश जाधव, चिंचोली आणि प्रसिद्ध हलागीवादक सुनील नागरपोळे, कागल हे उपस्थित राहणार आहेत. दिनांक २९ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री १२ वाजता देवाचा छबिना, पालखी आणि त्यानंतर मनोरंजनासाठी मनवकर लोकनाट्या तमाशा मंडळ कराड यांचा कार्यक्रम होणार आहे. या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित पाटील तसेच रणवीरसिंह गायकवाड उपस्थित राहणार आहेत. हे मैदान यशस्वी होण्यासाठी भीमराव पाटील (सरपंच), गोरक्ष पाटील (उप सरपंच), ग्रामपंचायत सदस्य, नाईकबा यात्रा उत्सव कमिटी मुंबईकर, सोंडोलीकर ग्रामस्थ मंडळ प्रयत्न करत आहेत.