Saturday, September 21, 2013

Thursday, September 5, 2013

Sujay Jadhav Sondoli at Salshirambe, Undale, Karad Kusti maidan


रामराम मंडळी
कुस्तीचे वेड रक्तातच असावे लागतात.
काहीजणांना मैदान म्हणाल कि पोटात भीतीचा गोळा उठतो,तर काहीना मैदान म्हटलं कि कपडे काढू का फाडू असे होते.
या छोट्या पैल्वानाकडे पाहून त्याचे किती कौतुक करावे समजतच नाही.

नाव आहे पैलवान सुजय दत्तात्रय जाधव
गाव आहे सोंडोली तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर.
वय फक्त ६ वर्षे..
हा फोटो आहे कराड तालुक्यातील साळशिरंबे या गावातील मैदानात जेव्हा सुजय विजय होऊन बाहेर येत आहे.
त्याच्याबरोबर आहेत त्याचे आजोबा जालीन्धर देशमुख.
सुजय हा पैलवान संजय जाधव सोन्डोलीकर यांचा पुतण्या आणि कुस्तीप्रचारक संघटक दत्तात्रय जाधव सोन्डोलीकर यांचा चिरंजीव आहे.
सुजयला कुस्त्यांचे व्हीडीओ पाहण्याचा छन्द आहे.मोठमोठ्या मैदानात कुस्त्या पाहायला जाने हा याचा आवडता छन्द.
आपली पोर कसला छन्द जोपासत आहेत जर लक्ष द्या.
भविष्यात सुजय नक्कीच मोठा कुस्तीगीर होईल यात शंका नाही कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्याचे सगळे शौक हे पैलवानकीचे आहेत. सुजय नक्कीच या मायभूचे पांग फेडणार.
शुद्ध बिजा पोटी ,फळे रसाळ गोमटी
या तुकोबारायांच्या ओवीनुसार त्याचे वडील सुध्दा फार मोठे कुस्ती संघटक आहे ,एक सच्चरित व्यक्तिमत्व म्हणजे दत्तात्रय जाधव.
कुस्तीसाठी धडपडणाऱ्या ठराविक महान लोकांपैकी एक म्हणजे जाधवराव होय.

सुजय आणि त्यांच्या कुस्तीसाठी झटणाऱ्या परिवाराला कुस्ती मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा.

धन्यवाद
गणेश



 

पैलवान संजय जाधव, सोंडोली. SANJAY JADHAV Sondoli Taluka Shahuwadi

रामराम मंडळी
हा भाल्यासारखा उंचापुरा देखणा पैलवान आहे पैलवान संजय जाधव.

गाव आहे त्याचे शाहुवाडी तालुक्यातल आणि कोल्हापूर जिल्यातील सोंडोली.
तालीम आहे राजर्षी शाहू कुस्ती केंद्र आणि वस्ताद आहेत जालिंदर मुंढे (आबा )
२०१ २ साली ८४ किलो गटामधून मुंबई उपनगर तालीम संघातर्फे महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली होती.
सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातील अनेक मैदानातील एक झंझावाती मल्ल म्हणून नावलौकिक आहे.
संजय हा युवा स्फूर्ती प्रतिष्ठान चा मानधनधारक पैलवान आहे
वारणेच्या जागतिक कुस्ती मैदानात दत्ता मगर या पैल्वानाबरोबर एक तासाची काटा टक्कर दिली होती हि त्याच्या कुस्ती कारकिर्दीतील अविस्मरणीय कुस्ती होय.
मागच्याच वर्षी हिंदकेसरी भारत केसरी पैलवान रोहित पटेल यांच्यासोबत रोहित च्या आखाड्यात ५ महिने सरावाला होता त्यावेळी पंजाब प्रांतात एकाहून एक अश्या ४० मैदानात झंझावाती कुस्त्या करत अनेक पंजाबी मल्लांना अस्मान दाखवले.
अजून १- २ वर्षात महाराष्ट्रातील क्रमांक एकच पैलवान म्हणून जरूर नावलौकिक होणार असे दिग्गजांचे मत आहे.
मुंबईचे प्रसिध्द कुस्तीप्रचारक व संघटक दत्तात्रय जाधव सोन्डोलीकार यांचे ते सख्खे बंधू आहेत.

संजय तुला भावी वाटचालीस कुस्ती मल्लविद्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद
गणेश -

कुस्ती-मल्लविद्या

SABHAR: facebook.com/kustimallavidya