2011 साली मुंबई येथे महाराष्ट— शासनाच्या वतीने खाशाबा जाधव स्पर्धा झाली हाेती. हि स्पर्धा महाराष्ट राज्य कुस्तिगीर परिषद यांच्या मार्गदार्नखाली हाेते. त्यावर्षी मी या स्पर्धेचा सर्व तपशील माहिती अधिकारातून मागविला आणि धक्कादायक माहिती समाेर आली. (साेबत त्याची लाेकमत मधील बातमी जाेडत आहे. यासाठी या लिंक वर क्लिक करा) या स्पर्धेमध्ये 50 लाख निधी असताना कुस्तीगीर परिषदेने बक्षिसे 9 लाख 60 रुपयेही दिली. इतर खर्च 30 लाख 74 हजार 203 रुपयांचा केला. आणि 9 लाख 65 हजार 797 रुपयाचा निधी शासनाला परत केला. जे ह्या 9 लाख 65 हजारांची बक्षीसे दिली असती तर कुस्तीगिरांना डबल बक्षिसे मिळाली असती. पण कुस्तीगीर परिषद हि खेळाडूसाठी नाहीच असे या उदाहरणावरून म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment