Thursday, September 5, 2013

Sujay Jadhav Sondoli at Salshirambe, Undale, Karad Kusti maidan


रामराम मंडळी
कुस्तीचे वेड रक्तातच असावे लागतात.
काहीजणांना मैदान म्हणाल कि पोटात भीतीचा गोळा उठतो,तर काहीना मैदान म्हटलं कि कपडे काढू का फाडू असे होते.
या छोट्या पैल्वानाकडे पाहून त्याचे किती कौतुक करावे समजतच नाही.

नाव आहे पैलवान सुजय दत्तात्रय जाधव
गाव आहे सोंडोली तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर.
वय फक्त ६ वर्षे..
हा फोटो आहे कराड तालुक्यातील साळशिरंबे या गावातील मैदानात जेव्हा सुजय विजय होऊन बाहेर येत आहे.
त्याच्याबरोबर आहेत त्याचे आजोबा जालीन्धर देशमुख.
सुजय हा पैलवान संजय जाधव सोन्डोलीकर यांचा पुतण्या आणि कुस्तीप्रचारक संघटक दत्तात्रय जाधव सोन्डोलीकर यांचा चिरंजीव आहे.
सुजयला कुस्त्यांचे व्हीडीओ पाहण्याचा छन्द आहे.मोठमोठ्या मैदानात कुस्त्या पाहायला जाने हा याचा आवडता छन्द.
आपली पोर कसला छन्द जोपासत आहेत जर लक्ष द्या.
भविष्यात सुजय नक्कीच मोठा कुस्तीगीर होईल यात शंका नाही कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्याचे सगळे शौक हे पैलवानकीचे आहेत. सुजय नक्कीच या मायभूचे पांग फेडणार.
शुद्ध बिजा पोटी ,फळे रसाळ गोमटी
या तुकोबारायांच्या ओवीनुसार त्याचे वडील सुध्दा फार मोठे कुस्ती संघटक आहे ,एक सच्चरित व्यक्तिमत्व म्हणजे दत्तात्रय जाधव.
कुस्तीसाठी धडपडणाऱ्या ठराविक महान लोकांपैकी एक म्हणजे जाधवराव होय.

सुजय आणि त्यांच्या कुस्तीसाठी झटणाऱ्या परिवाराला कुस्ती मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा.

धन्यवाद
गणेश



 

No comments:

Post a Comment